आता विश्चात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ।।१।।
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो ।
भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे ।।२।।
दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ।।३।।
वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां ।।४।।
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गांव ।
बोलते जे अर्णव, पीयूषाचे ।।५।।
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु ।।६।।
किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहींलोकीं ।
भजि जो आदिपुरुखी, अखंडित ।।७।।
आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये ।
दृष्टादृष्ट विजये, होआवे जी ।।८।।
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो, हा होईल दानपसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ।।९।।
श्री विठ्ठल वारकरी साधक संघ [ऋषिकेश, उत्तराखंड] भगवान् श्री विठ्ठल आणि संतश्री ज्ञानेश्वर महाराजजी यांच्या कृपेने आणि स्वानंदसुखनिवासी सद्गुरु जोग महाराजजी यांच्या प्रेरणेने आणि प.पू.शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर (आळंदी देवाची, पुणे, महाराष्ट्र) यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेला श्री विठ्ठल वारकरी साधक संघ (SVVSS) गैर-राजकीय संघठन आहे. गेली एक दशकाहून अधिक काळ ही संस्था विविध प्रकारचे मानवतावादी, समाजसेवेचे कार्य करत आहे.त्याग आणि सेवेच्या आदर्शाने प्रेरित होऊन संस्थेचे कार्यकर्ते जात, धर्म,पंथ, संप्रदाय असा कोणताही भेद न करता संपूर्ण भारताची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत.
आपल्या कुटुंबाचा व घराचा संपूर्ण त्याग करून ब्रह्मविद्येच्या जिज्ञासेने देश-विदेशातून हजारो संत महात्मे, मुमुक्षू, साधक, भगवद् भक्त ऋषिकेशला येतात. ते येथे येऊन वैदिक संस्कृत ग्रंथांचं अध्ययन - अध्यापन, ध्यान, भजन, संकीर्तन करतात. यावेळी ब्रह्मचारी, संत-महात्म्यांच्या भोजनाचीआणि राहण्याची खूप अव्यवस्था असल्याने त्यांच्या भोजनाची स्थायी व्यवस्था करण्यासाठी संस्थेने तातडीने अन्नक्षेत्राची स्थापना केली. सध्या अन्नक्षेत्रात सकाळचा नाष्टा व संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.जेवणासाठी खर्च होणारी रक्कम तुम्हा सर्व श्रद्धाळू भाविकांद्वारे प्राप्त होत असते. आत्ता ही पैशा-अभावी स्थायी भोजन व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे सर्व दानशूर भक्तांना नम्र विनंती आहे की, या पवित्र महायज्ञात आपले आहुतीरूपी मौल्यवान धन अर्पण करून भगवंताच्या कृपेस पात्र व्हावे.
ही संस्था हिमालयाच्या पवित्र संगतीत आणि देवभूमी ऋषिकेश येथील भगवती गंगा मातेच्या तीरावर वसलेली आहे.
भव्य निवास व्यवस्था, गुरुकुल शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, गोसंवर्धन.